Join us

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गृहनिर्माण विकास महामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 05:29 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी मोठ्या वसाहतींचे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी मोठ्या वसाहतींचे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या महामंडळामार्फत २०२२ पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लाभार्र्थींसाठी पाच लाख परवडणारी घरे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रकल्पात किमान पाच हजार घरकुलांचा समावेश असेल. या योजनेंतर्गत २०२२ पर्यंत १९ लाख ४० हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील ३८३ शहरांमध्ये घरे बांधण्यास केंद्र सरकारने मान्यतादेखील दिली आहे.