Join us

सानपाड्यामध्ये तीन इमारतीत घरफोड्या

By admin | Updated: May 15, 2014 00:06 IST

सानपाडा सेक्टर ५ मधील तीन इमारतींमध्ये मंगळवारी चोरी झाली. चोरट्यांनी दरवाजाचे कडी - कोयंडे तोडून आतमधील दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ५ मधील तीन इमारतींमध्ये मंगळवारी चोरी झाली. चोरट्यांनी दरवाजाचे कडी - कोयंडे तोडून आतमधील दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. सानपाडा विभागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू केल्यानंतरही येथील गुन्हे आटोक्यात आलेले नाहीत. अत्यंत कमी कार्यक्षेत्र असतानाही गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना अपयश येवू लागले आहे. मंगळवारी स्वस्तिक, राधाकृष्ण व पंचवटी इमारतीमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी जवळपास १२ घरांचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. येथील स्वस्तिक इमारतीमध्ये राहणारे गणपत अतकरी हे घरात नसताना चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमधील दागिने व रोख रक्कम असा जवळपास १३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतर ठिकाणी झालेल्या चोरीचा तपशील पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध नाही. दिवसा झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे अनेक नागरिक गावी गेले आहेत. यामुळे चोरी व घरफोडीच्या घटना होत असून पोलिसांनी अधिक दक्ष राहून गुन्हे नियंत्रणात आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)