Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाशीमध्ये घराला आग

By admin | Updated: July 18, 2014 00:21 IST

वाशी सेक्टर १० मधील महालक्ष्मी इमारतीमधील एक घराला आग लागली. आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे

नवी मुंबई : वाशी सेक्टर १० मधील महालक्ष्मी इमारतीमधील एक घराला आग लागली. आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. येथील जेएन टाईप वसाहतीमध्ये असलेल्या महालक्ष्मी इमारतीमधील सुधेश भोसले यांच्या घरामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. येथील नागरिकांनी तत्काळ वाशी अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली. १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वाशी अग्निशमन दलाचे एक फायर इंजिन व एका टँकरच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. जवळपास १ तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सदर घटनेमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निमार्ण झाले होते. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)