पोलादपूर : सलग चार दिवस तालुक्यात संततधार पावसामुळे देवळे ग्रामपंचायत हद्दीतील हळदुळे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव देवजी जाधव व गणेश जाधव यांच्या घरासमोरचे कौलारू छत कोसळले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना शनिवारी दुपारी घडली.दरम्यान, या घराच्या छताखाली शाळकरी लहान मुळे खेळत होती, मात्र मुले घराच्या मागच्या दरवाजातून घराच्या बाहेर पळाली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}