Join us

रेशनिंग अधिकाऱ्यांना ५० हजारांचा हफ्ता?

By admin | Updated: April 17, 2015 01:29 IST

महिला बचत गटांना रेशनिंग दुकानांचे परवाने मिळावेत, म्हणून मुंबई रेशनिंग कार्डधारक संघटनेने मागणी केली आहे.

मुंबई : महिला बचत गटांना रेशनिंग दुकानांचे परवाने मिळावेत, म्हणून मुंबई रेशनिंग कार्डधारक संघटनेने मागणी केली आहे. मात्र दुकान सुरू करण्यासाठी शिधा पुरवठा विभागाच्या ‘अ’ परिमंडळात संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाबीचा खुलासा केला आहे. लहान मोठ्या अधिकाऱ्यांना मिळून वर्षाला ५० हजार रुपयांचा हफ्ता दुकानदार देत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.संघटनेच्या अध्यक्षा वंदना माने म्हणाल्या की, बचत गटांना काम मिळावे म्हणून प्रशासनाने शिधावाटपाचे काम महिला बचत गटांना देण्याची मागणी केली होती. मात्र दुकाने कशी चालतात, याचा आढावा घेण्यासाठी अ परिमंडळातील काही दुकानांचे सर्वेक्षण केले. त्यात ९० टक्के दुकाने ही मूळ मालकांनी भाड्याने चालवण्यास दिल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे दुकानाची तपासणी करणाऱ्या रेशनिंग निरीक्षकालाही या बाबीची कल्पना असल्याचे समजले. तरीही दुकानांवर कारवाई होत नसल्याचे आश्चर्य वाटले. या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता महिन्याकाठी सुमारे ५ हजारांचा हफ्ता भ्रष्ट अधिकाऱ्यांना जात असल्याचे कळले. (प्रतिनिधी)