Join us

वसतिगृहाचा प्रकल्प रखडला!

By admin | Updated: June 1, 2015 22:22 IST

पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता शासनाच्या आदिवासी विभागांतर्गत कळंबोली येथे भूखंड निश्चित करण्यात आला आहे.

अरुणकुमार मेहेत्रे, कळंबोलीपडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता शासनाच्या आदिवासी विभागांतर्गत कळंबोली येथे भूखंड निश्चित करण्यात आला आहे. मात्र सिडकोच्या अनागोंदी कारभारामुळे रक्कम अदा करूनही भूखंडांचे हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत आहे.पडघे येथील वसतिगृहात पाचशे विद्यार्थ्यांची मान्यता असून याकरिता मोठ्या जागेची गरज आहे. त्यामुळे २०१० साली पडघे कोळवाडा येथे एकूण ९ हजार चौरस फुटांची इमारत घेऊन त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यात आले. या वसतिगृहात पुरेशा सोयी-सुविधा असल्या तरी पनवेलपासून दूर असल्याने विद्यार्थ्यांना ये - जा करण्यास अडचणीचे ठरत आहे. शासकीय नियमानुसार, प्रत्येक मुलाला कमीत कमी ४० फूट जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यानुसार पडघे येथील आदिवासी वसतिगृहासाठी कमीत कमी २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची आवश्यकता आहे. इतकी मुबलक जागा पनवेल किंवा आजूबाजूला भाडेतत्त्वावर मिळणे कठीण असल्याने आदिवासी प्रकल्प कार्यालयाने वसतिगृहासाठी हक्काची जागा असावी, याकरिता सिडकोकडे २०११ मध्ये प्रस्ताव सादर केला होता.