Join us  

रुग्णालयांतील अग्नी सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 1:38 AM

इतरत्र घटना घडल्यावर मुंबई महापालिका प्रशासनाला येते जाग

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विरार येथील आगीच्या दुर्घटनेप्रमाणेच दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतील मॉलमधील रुग्णालयाला लागलेल्या आगीत रुग्णांचा नाहक बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या आदेशानुसार पुन्हा सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात येत आहे. मात्र जेमतेम पाच महिन्यांपूर्वी झालेल्या ऑडिटमध्ये ७६२ रुग्णालये व नर्सिंग होममध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उजेडात आले होते. यापैकी ३८ छोटी रुग्णालये, नर्सिंग होम बंद करण्याची शिफारसही अग्निशमन दलाने केली होती. यावर पुढे कारवाई होईपर्यंत पुन्हा नव्याने ऑडिट सुरू करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये अग्निशमन दलाने १४०० रुग्णालयांची झाडाझडती घेतली होती. यामध्ये ७६२ नर्सिंग होम, रूग्णालय असुरक्षित असल्याचे उजेडात आले. या रुग्णालयांना नोटीस पाठवून १२० दिवसांमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची मुदत देण्यात आली. त्यानुसार काही रुग्णालयांनी आवश्यक दुरुस्त्या केल्या. तर अडीशे रुग्णालयांमध्ये बदल न केल्याचे समोर आले. 

रुग्णालयांमध्ये हे असणे आवश्यकफायर अलार्म,फायर स्प्रिकलर्स, अंतर्गत अग्निप्रतिबंधक उपायसाठी फायर एक्झींग्यूशर, आपात्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र जिने, व्हरांड्यात, जिन्यात कोणतेही अडथळे, अडगळ नसावी, इमारतीच्या उंची क्षेत्रफळानुसार उपायांचे स्वरुप बदलते.भंडारा जिल्हा रूग्णालयात लागलेल्या भीषण आगीनंतर अधिवेशनातही रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. 

भांडुप येथील ड्रीम मॉलमधील सनराइज् रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने रुग्णांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे हे दाखवून दिले. त्यानंतरही दहिसर कोबड केंद्रामध्ये आग लागण्याची घटना घडली. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने पुन्हा सर्व कोविड केंद्र व रुग्णालयांचे ऑडिट बंधनकारक केले आहे. त्यानुसार आतापर्यंत १७०० रूग्णालय, नर्सिंग होमची झाडाझडती अग्निशमन दलाने घेतली आहे. ऑडिटचे काम अद्याप सुरूच असल्याचे अग्निशमन दलातील सूत्रांनी सांगितले.

रुग्णालयातील आगीच्या घटना४ एप्रिल २०२१ : दहिसर येथील कोविड केंद्रात आग लागण्याची घटना घडली. यावेळी ५० रुग्णांना तातडीने अन्य ठिकाणी हलविण्यात आले. २६ मार्च २०२१ : भांडुप, ड्रीम्स मॉलमधील सनराइज् रुग्णालयात आग लागून ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू.१२ ऑक्टोबर २०२० : मुलुंड, अपेक्स रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रामध्ये आग लागल्याने ४० रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. मात्र स्थलांतर करताना अत्यवस्थ असलेल्या एका रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला. तर आणखी एका रुग्णाचा फोर्टिस रुग्णालयात दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. २९ ऑक्टोबर २०२० : दहिसर, कांदरपाडा परिसरात कोविड रुग्णालयात अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. यावेळी प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.१७ डिसेंबर २०१८ : अंधेरीतील कामगार रुग्णालयात भीषण आगीत आठ लोकांचा मृत्यू झाला होता.

अग्निशमन दलाची शिफारसजेमतेम पाच महिन्यांपूर्वी झालेल्या ऑडिटमध्ये ७६२ रुग्णालये व नर्सिंग होममध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उजेडात आले होते. यापैकी ३८ छोटी रुग्णालये, नर्सिंग होम बंद करण्याची शिफारसही अग्निशमन दलाने केली होती. 

टॅग्स :आग