Join us  

लोकलखाली आल्याने घोड्याचा मृत्यू, मध्य रेल्वे विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 11:29 AM

 मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. वांगणी आणि बदलापूर स्थानकादरम्यान अचानक एक घोडा अचानक लोकलच्या खाली येऊन अपघात झाल्यामूळे मुंबईकडे येणारी वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे.

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. वांगणी आणि बदलापूर स्थानकादरम्यान अचानक एक घोडा लोकलच्या खाली येऊन अपघात झाल्यामूळे मुंबईकडे येणारी वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागला.

आज सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास वांगणी स्थानकादरम्यान अप मार्गावर ही घटना घडली. एक घोडा अचानक रेल्वे रुळावर आला, त्याचवेळी समोरून आलेल्या लोकलने या घोड्याला उडविले. त्यामुळे घोड्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे अप मार्गावरील रेल्वे अर्धा तास उशिराने धावत आहेत.

 

टॅग्स :मुंबई लोकलमध्य रेल्वेभारतीय रेल्वे