Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिला शक्तीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST

मुंबई : पोलीस दलात काम करत असताना उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला पोलिसांचा पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्ते सत्कार ...

मुंबई : पोलीस दलात काम करत असताना उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला पोलिसांचा पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र आणि भेटवस्तू देण्यात आली आहे.

अवघ्या वयाच्या २७व्या वर्षी तपासाची सेन्चुरी मारणाऱ्या मालवणी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उषा खोसे, रायगड जिल्ह्यातील धामणी गावातील ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेल्या नायगाव सशस्त्र विभागातील पोलीस नाईक ५० मुलांना दत्तक घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रेहाना शेख यांच्यासारख्या ३० महिला पोलिसांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच कोरोनाच्या काळात एकाच दिवशी चार मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या संध्या शिलवंत यांनाही यात गौरविण्यात आले. आझाद मैदान पोलीस क्लब येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सह आयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त (मुख्यालय १) एन. अंबिका, नियती ठाकर, सानप उपस्थित होते.

....

कुटुंबीयातील महिलांचाही सत्कार...

यात, महिला पोलिसांचा नाही, तर त्यांच्या कुटुंबीयातील विविध क्षेत्रांत यश मिळविलेल्या महिलांचाही सत्कार यावेळी करण्यात आला आहे.

....