Join us

कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:15 IST

मुंबई : वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथील पालिकेच्या जम्बो कोविड समर्पित रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक ...

मुंबई : वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथील पालिकेच्या जम्बो कोविड समर्पित रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक या कोरोना योद्ध्यांचा सत्कार महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यात या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन या वेळी त्यांनी केले.

केवळ १५१ प्रतिबंधित क्षेत्रे

मुंबई : कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर झपाट्याने मुंबईतील अनेक बाधित विभागांना प्रतिबंधित करण्यात आले होते. मात्र आता या विषाणूचा प्रसार नियंत्रणात येत असल्याने २४५५ बाधित क्षेत्रे आतापर्यंत प्रतिबंधमुक्त करण्यात आली आहेत, तर आता केवळ १५१ झोपडपट्ट्या, चाळी प्रतिबंधित आहेत.

जिजाऊंच्या पूर्णाकृती शिल्पास पुष्पहार

मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील बाल शिवाजीसह जिजाऊंच्या पूर्णाकृती शिल्पास मंगळवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.