Join us

शिवाजीराव जोंधळे यांना मानद डॉक्टरेट

By admin | Updated: December 12, 2015 01:53 IST

अमेरिकेतील लास व्हेगास येथील न्यू एज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने समर्थ समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांचा मानद डॉक्टरेट देऊन गौरव केला आहे.

डोंबिवली : अमेरिकेतील लास व्हेगास येथील न्यू एज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने समर्थ समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांचा मानद डॉक्टरेट देऊन गौरव केला आहे. कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या पदवीदान समारंभात त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. सुवर्णपदक, जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून कोलकात्याच्या इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन, रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने त्यांची निवड केली. तसेच संस्थेच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ - शहापूर-डोंबिवलीतील शैक्षणिक कार्यासाठी व क्वालिटी एज्युकेशन मॅनेजमेंटसाठी आणि ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण उन्नतीला हातभार लावणारी शैक्षणिक प्रगती घडविल्याबद्दल त्यांना ही पदवी प्रदान केली.