Join us

...आणि मावळते खासदार गहिवरले; खासदार गोपाळ शेट्टी यांचा गौरव

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 21, 2024 17:09 IST

बोरीवली पूर्व येथील ॲम्ब्रोसिया येथे पियुश गोयल यांच्या प्रचारासाठी माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी सभा आयोजित केली होती.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबईचे उमेदवार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुश गोयल यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम कदम यांनी मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांचा गौरव केला. तेंव्हा ते अतीशय गहिवरले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. जेंव्हा केंव्हा गोपाळ शेट्टी यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात येईल तेंव्हा इतिहासकारांना त्यांनी उभारलेल्या बोरीवली पूर्व येथील राष्ट्रध्वजाच्या स्तंभाची उंची आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नांवाने उभारण्यात आलेल्या प्रशस्त मैदानाचे क्षेत्रफळही मोजावे लागेल, अशा शब्दांत श्याम कदम यांनी  त्यांच्या कार्याचा गौरव केला. 

बोरीवली पूर्व येथील ॲम्ब्रोसिया येथे पियुश गोयल यांच्या प्रचारासाठी माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी सभा आयोजित केली होती.

यावेळी स्वतः उमेदवार पियुश गोयल, खासदार गोपाळ शेट्टी, भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी च्या गेल्या दहा वर्षांतील यशस्वी घोडदौडीचा उल्लेख करुन श्याम कदम म्हणाले की, भारतीय जनता पार्टी चा अश्वमेध इतका वेगाने दौडत आहे की, तो अडवायला लव आणि कुश आता येऊ शकणार नाहीत.