Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार स्त्रीशक्तीचा सन्मान

By admin | Updated: October 13, 2016 04:17 IST

समाजाच्या विविध घटकांतील स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान करण्याची पूर्वापार परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून ‘लोकमत’ने देखील असामान्य

मुंबई : समाजाच्या विविध घटकांतील स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान करण्याची पूर्वापार परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून ‘लोकमत’ने देखील असामान्य सेवाव्रतींचा सन्मान करण्याचे योजिले आहे. हा खास सोहळा गुरुवार, १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता दादर येथील धुरू हॉल येथे रंगणार आहे.लोकमत सखी सन्मान कार्यक्रमाचे शुभविधी आणि संस्कृती दर्पण प्रतिष्ठान सहप्रायोजक आहेत. ‘लोकमत’ सखी सन्मानाने सामाजिक, शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, सांस्कृतिक-साहित्यिक अशा विविध क्षेत्रांतील स्त्रियांना सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय, ‘लोकमत सखी सन्मान जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सामान्य ते असामान्य अशा प्रवासातल्या कार्यरत स्त्रियांची दखल घेऊन त्यांना एक स्थान, सन्मान आणि अभिमान याची जाणीव लोकमत सखी सन्मानच्या माध्यमातून करून देण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)