मुंबई : कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलला जॉइंट कमिशन इंटरनॅशनल (जेसीआय, यूएसए) गोल्डन सील मान्यता प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. रुग्णालयाचा दर्जा आणि रुग्ण सुरक्षेसंबंधातील अतिशय उच्च मानक गाठणाऱ्या रुग्णालयाला हे प्रमाणपत्र देण्यात येते.जेसीआयचे प्रमाणपत्र मिळवणारे कोकिलाबेन हे एकमेव रुग्णालय ठरले आहे. शिवाय वैद्यकीय क्षेत्रातील एनएबीएच, एनएबीएल, सीएपी आणि जेसीआय ही चारही प्रमाणपत्रे मिळवणारे कोकिलाबेन हे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. या प्रमाणपत्रासाठी रुग्णालयाला डिसेंबर २०१५ मध्ये अतिशय कठीण अशा आॅनलाइन सर्वेक्षणाला सामोरे जावे लागले होते. युनायटेड स्टेट्स, दक्षिण अमेरिका, युरोप आणि पूर्ववर्ती भागांमधून घेतलेल्या शिष्टाचारांवर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ समितीने हे सर्वेक्षण घेतले होते. हे मूल्यांकन रुग्णांच्या सेवेला आणि सुरक्षेला केंद्रस्थानी घेऊन केले जाते. शिवाय रुग्णांच्या घेतलेल्या काळजीतील समन्वय आणि व्यापकतेची खात्री देते. प्रमाणपत्र तीन वर्षांच्या कालावधीसाठी दिले जात असून, ते रुग्णालयासाठी मानक सुनिश्चित करतात, ज्यामुळे रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्याची शाश्वती मिळते. (प्रतिनिधी)
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचा सन्मान
By admin | Updated: January 30, 2016 01:20 IST