Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा पोल कोसळून घरांचे नुकसान

By admin | Updated: July 21, 2014 23:25 IST

भलीमोठी फांदी तुटून विजेच्या तारांवर आणि घरांवर पडल्याने तसेच विजेचा पोल तुटल्याने येथील जवळपास चार घरांचे नुकसान झाले आहे.

दासगांव : रविवारी रात्री साडेतीनच्या सुमारास महाड तालुक्यातील नरवण आदिवासी वाडीवर कडुलिंबाच्या झाडाची एक भलीमोठी फांदी तुटून विजेच्या तारांवर आणि घरांवर पडल्याने तसेच विजेचा पोल तुटल्याने येथील जवळपास चार घरांचे नुकसान झाले आहे. 
महाड तालुक्यातील नरवण आदिवासीवाडी येथे रविवारी रात्री 3.3क् वाजण्याच्या सुमारास शेजारील एका कडुलिंबाच्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटली. ही फांदी येथील विजेच्या तारांवर तसेच रामा बाळू मुकणो यांच्या घरावर पडली. यामुळे रामा बाळू मुकणो यांच्या घराचे नुकसान झाले. यामुळे विजेच्या तारांवर ताण पडून जवळचाच एक सिमेंट पोलदेखील तुटला आणि हा तुटलेला पोल शंकर बाळू वाघमारे यांच्या घरावर कोसळल्याने घराच्या पुढील भागाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. विजेच्या तारा पडून इतरांच्या घराचेदेखील किरकोळ नुकसान झाले आहे. 
सामाजिक कार्यकर्ते दीपक आमराळे यांनी या घटनेचे वृत्त प्रशासनाला कळवले. महावितरण कंपनीचे कर्मचारी तसेच महाड महसूल विभागाच्या कर्मचा:यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देवून पंचनामे केले. आदिवासींच्या घरांवर विजेचा खांब पडल्याने मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)