Join us

कजर्तमध्ये चार ठिकाणी घरफोडय़ा

By admin | Updated: October 28, 2014 22:52 IST

शहरात एकाच दिवशी चार घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मालिकाफेम जुई गडकरीच्या कजर्त येथील घरातही चोरी झाल्याचे उघड झाले आहे.

कजर्त : शहरात एकाच दिवशी चार घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मालिकाफेम जुई गडकरीच्या कजर्त येथील घरातही चोरी झाल्याचे उघड झाले आहे. तिच्या घराच्या मागे असलेल्या एका इमारतीतील सद्भाव फाउंडेशनचे कार्यालय फोडून सहा हजारांची नाणी पळविली. अशाच आणखी दोन ठिकाणची घरे फोडली असली तरीही चोरटय़ांच्या हाती काहीच लागलेले नाही.
कर्जत शहरातील विठ्ठल नगर भागातील यशोदत्त अपार्टमेंटमध्ये  केतन श्रीकृष्ण गडकरी आपल्या कुटुंबीयांसह रहात होते. त्यांची अभिनेत्री असलेली मुलगी जुई गडकरीला चित्रीकरणासाठी जाणो सोपे व्हावे याकरिता कुटुंब ठाणो येथे राहावयास गेले आहेत. दिवाळीसाठी कर्जतला येऊन ते पुन्हा ठाण्याला गेले. या दरम्यान चोरटय़ांनी त्यांच्या कजर्तच्या घरात शिरून सोन्याचे झुमके व चांदीचे ताट पळविले. चोरटय़ांनी येथे डल्ला मारल्यावर यशोदत्त अपार्टमेंटच्या मागेच असलेल्या लक्ष्मी व्हिला इमारतीतील सद्भाव फाउंडेशनचे कार्यालयही फोडले, मात्र तेथून त्यांना केवळ सहा हजार रुपयांच्या चिल्लरशिवाय काहीही मिळाले नाही. तुलसी अंगण या रेल्वे स्थानकानजीकच्या इमारतीत निराजकुमार साठवले यांचे आणि आणखी एक बंद घर फोडले, परंतु चोरटय़ांच्या हाती काहीही लागले नाही. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना विठ्ठल पाटील व गिरीधर पाटील तपास करीत आहेत.
 
सव्वासात लाखांचा ऐवज लंपास
अलिबाग : कजर्त तालुक्यातील नेरळ-कशेळे मार्गावरील बोपले गावांतील संदीप हनुमंत देवरुखकर यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडूुन घरातील कपाट फोडून तब्बल 7 लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरटय़ांनी रविवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान लंपास केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या सूत्रंनी दिली आहे. देवरुखकर कुटुंबीय शिर्डी येथे देवदर्शनाकरिता गेले असताना हा प्रकार घडला.