Join us

साठे महामंडळातील भ्रष्टाचाराविरोधात धरणे

By admin | Updated: October 14, 2015 03:51 IST

मातंग समाजाला ८ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा कारभार सुरळीत सुरू करावा म्हणून अखिल भारतीय मातंग संघाने क्रांती अभियानाला सुरुवात केली

मुंबई : मातंग समाजाला ८ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा कारभार सुरळीत सुरू करावा म्हणून अखिल भारतीय मातंग संघाने क्रांती अभियानाला सुरुवात केली आहे. २६ जानेवारीपर्यंत आरक्षण मिळाले नाही आणि महामंडळाचा व्यवहार सुरू झाला नाही, तर समाजाचे कार्यकर्ते प्रजासत्ताक दिनी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आत्मदहन करणार असल्याचे मातंग नेते बाबासाहेब गोपले यांनी सांगितले.नुकत्याच झालेल्या मेळाव्यात धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मातंग आरक्षणाला पाठिंबा दिल्याचे गोपले यांनी सांगितले. गोपले म्हणाले की, महामंडळातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्ज प्रकरणे आणि व्यवसायासाठी देण्यात येणारी लहान कर्जवाटप प्रकरणे महामंडळाने तत्काळ सुरू करावी. या प्रकरणी लाल सेनेने मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. महामंडळातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असताना कर्जवाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची संघटनेची प्रमुख मागणी होती. (प्रतिनिधी)