Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिट अ‍ॅँड रनची तारीख सोमवारी जाहीर होणार

By admin | Updated: April 19, 2015 01:56 IST

अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेला खटला अंतिम टप्प्यात असून, याच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर केली जाणार असल्याचे सत्र न्यायालयाने शनिवारी स्पष्ट केले.

मुंबई : अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेला खटला अंतिम टप्प्यात असून, याच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर केली जाणार असल्याचे सत्र न्यायालयाने शनिवारी स्पष्ट केले. शनिवारी कामकाज संपल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाला येत्या सोमवारपर्यंत युक्तिवाद संपवण्याची सूचना केली. तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर याच्या निकालाची तारीख जाहीर केली जाईल, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.