Join us  

मुंबई शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप, सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा केला पार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 4:03 PM

शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच चांगली तेजी पाहायला मिळाली. पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा पार केला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 10,760 हजारांपर्यंत गेला.

मुंबई- शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच चांगली तेजी पाहायला मिळाली. पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा पार केला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 10,760 हजारांपर्यंत गेला. यावेळी शेअर बाजार खरेदीदार वाढल्यानं मुंबई शेअर बाजारानं हा उच्चांक गाठला आहे. त्याप्रमाणेच आयटी कंपन्यांचं रेटिंग वाढल्याचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी शेअर बाजारानं 312.89 अंकांची उसळी घेत 35,083पर्यंत पोहोचला. तर बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही 300 अंकांची वाढ झाली आहे. तसेच निफ्टीलाही 87.40 अंकांची मजबुती मिळाल्यानं तो 10,787पर्यंत गेला आहे.इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, एचसीएलसह दुस-या कंपन्यांचं टार्गेटही वाढवण्यात आलं आहे. आयटी रेटिंग वाढल्यामुळे शेअर बाजार वधारला आहे. बँकिंग, ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्सला याचा चांगला फायदा झाला. अॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस बँक सारख्या बँकांचे शेअर्स तेजीत आले होते. 

अधिक परताव्यासाठी म्युच्युअल फंडात करा गुंतवणूकथेट शेअर बाजारात गुंतवणूक न करताही अधिक परतावा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. मात्र, त्यातही शेअर्सशी संबंधित गुंतवणुकीपासून गुंतवणूकदार स्वत:ला दूर ठेवत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांचा पैसा तो फंड व्यवस्थापक विविध क्षेत्रांतील विविध कंपन्यांमध्ये गुंतवतो. त्यात अनेक पर्यायांचा समावेश असतो. यापैकीच एक प्रकारची गुंतवणूक ही ‘इक्विटी लिंक’ अर्थात, थेट शेअर बाजारातील असते. शेअर बाजारातील संबंधित कंपनीत ही गुंतवणूक केली जाते. 

टॅग्स :शेअर बाजारमुंबई