Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासकार सावे कालवश

By admin | Updated: December 14, 2014 01:56 IST

ज्येष्ठ इतिहासकार अशोक परशुराम सावे यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. ते अंधेरी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी मालिनी, मुलगा कौस्तुभ आणि कन्या स्वाती असे कुटुंब आहे.

मुंबई : ज्येष्ठ इतिहासकार अशोक परशुराम सावे यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. ते अंधेरी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी मालिनी, मुलगा कौस्तुभ आणि कन्या स्वाती असे कुटुंब आहे.
चिंचणी-डहाणूचे अशोक सावे हे अभियंता झाल्यानंतर अनेक वर्ष भारतीय व बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये कार्यरत होते. मागील पंधरा वर्षापासून स्थानिक इतिहास, संस्कृती व भाषेचा अभ्यास आणि संशोधन करून त्यांनी आकाशवाणीसह वर्तमानपत्रत व नियतकालिकांसाठी लेखन केले होते. इतिहास संशोधक मंडळ, कोकण इतिहास परिषद, वसई- शूर्पारक इतिहास गौरव समिती या संस्थांमध्ये ते कार्यरत होते. महिकावतीची बखरच्या नवीन आवृत्तीच्या महत्त्वाच्या कार्यानंतर त्यांचे उत्तर कोकणच्या वाडवळी व तत्सम बोलीवरील पुस्तक आणि  ‘चिंचणी परिसर’ ही दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत. महिकावतीची बखरमधील अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर त्यांनी प्रकाश टाकला. इतिहासकार वि. का. राजवाडे, रा. चिं. ढेरे यांच्यानंतर सावे यांनी महिकावतीच्या बखरीचे पुन:संपादन केले. त्यांच्या बखरीला रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या ज्येष्ठ इतिहासकारांनी शोधप्रकल्पासह कार्यासाठी शाबासकी दिली होती. (प्रतिनीधी)