Join us

जुलैच्या अखेरपर्यंत उच्च न्यायालय घेणार व्हर्च्युअल सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुलै अखेरपर्यंत उच्च न्यायालय व्हर्च्युअल सुनावणी घेणार असल्याचा निर्णय मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुलै अखेरपर्यंत उच्च न्यायालय व्हर्च्युअल सुनावणी घेणार असल्याचा निर्णय मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे उच्च न्यायालयाचा प्रत्यक्ष कारभार सुरू होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

प्रत्येक खंडपीठ पाच तास काम करणार असून, महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी न्यायालयाचे कामकाज सुरू राहील. तर वकिलांना लोकलचा प्रवास करण्यास मुभा देण्यासंदर्भात राज्य सरकार व केंद्र सरकारने यावर लवकरच निर्णय घेऊ, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांना सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबई उच्च न्यायालय व नागपूर व औरंगाबाद खंडपीठाने एप्रिल २०२१ पासून व्हर्च्युअल सुनावणी घेण्यास सुरुवात केली. सध्या केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यात येत आहे.