Join us
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींची दखल न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला घेतले फैलावर

By admin | Updated: October 27, 2016 02:04 IST

गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक तक्रारी करूनही राज्य सरकारने त्यावर काहीच कारवाई न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने

मुंबई : गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक तक्रारी करूनही राज्य सरकारने त्यावर काहीच कारवाई न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. बोरिवली व उल्हासनगरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना अवमानाची नोटीसही उच्च न्यायालयाने बजावली.आत्तापर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशांवर काहीच पालन करण्यात आले नसल्याचे सरकारच्या प्रतिज्ञापत्रावरून सिद्ध होते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याचे निर्देश देत ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल, याची खात्री करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)