Join us
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाचा कंगनाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST

बेकायदेशीर बांधकाम कारवाई प्रकरण : वैयक्तिक द्वेषातून कारवाई केल्याचा महापालिकेवर ठपकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना ...

बेकायदेशीर बांधकाम कारवाई प्रकरण : वैयक्तिक द्वेषातून कारवाई केल्याचा महापालिकेवर ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पाली हिल येथील बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई कायद्याचे पालन न करता वैयक्तिक द्वेषापोटी, सूडबुद्धीतून केली आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने महापालिकेला मोठा दणका दिला. न्यायालयाने कंगनाला बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करीत तिला तोडलेले बांधकाम पूर्ववत करण्याची परवानगी दिली.

न्या. एस. जे. काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने १६६ पानी निकालपत्रात पालिकेने केलेली कारवाई अत्यंत घाईने आणि वाईट हेतूने, सूडबुद्धीने केल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांविरुद्ध ताकदीचा वापर करणे याला आम्ही मान्यता देत नाही, असे ठणकावत कंगनाला नुकसानभरपाई देणे योग्य आहे, असे म्हटले आहे.

कारवाईत झालेल्या नुकसानभरपाईची मोजदाद करण्यासाठी उच्च न्यायालयाने एका खासगी फर्मची नियुक्ती केली. न्यायालयाने कंगना व पालिकेला आपले म्हणणे फर्मसमोर मांडण्याचे निर्देश दिले. तसेच याचा खर्च कंगनाला करण्याचे निर्देश दिले.

पालिकेने ९ सप्टेंबर रोजी कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्यावर कारवाई केली. याला तिने उच्च न्यायालयात आव्हान देत कारवाई बेकायदेशीर ठरवावी व दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी तिने यातिकेत केली.

.........

* जबाबदारीचे भान ठेवून व मर्यादेत राहून बोलावे

न्यायालयाने कंगनालाही समज दिली. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती म्हणून सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या कोणत्याही विषयावर विचार मांडताना जबाबदारीचे भान ठेवून व मर्यादेत राहून बोलायला हवे. तसेच

.........