Join us

महापालिका शाळेतील स्वच्छतागृहे तपासण्याचे हायकोर्टाचे आदेश

By admin | Updated: November 19, 2014 02:18 IST

महापालिका शाळांमधील मुलींची स्वच्छतागृहे सुस्थितीत आहेत की, नाहीत हे तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शिक्षण निरीक्षकांना दिले आहेत.

मुंबई : महापालिका शाळांमधील मुलींची स्वच्छतागृहे सुस्थितीत आहेत की, नाहीत हे तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शिक्षण निरीक्षकांना दिले आहेत.याप्रकरणी एका सामाजिक संघटनेने जनहित याचिका दाखल केली आहे. पालिका शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहात पाण्याचा तुटवडा असतो, त्यामुळे मुलींची गैरसोय होते. तेव्हा पालिका शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यात यावीत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमुर्ती अभय ओक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी शाळांमधील स्वच्छतागृहे सुस्थितीत असल्याचा दावा पालिकेने केला. याची दखल घेत न्यायालयाने हे आदेश दिले. (प्रतिनिधी)