Join us  

हायकोर्टातील न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार ₹ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 8:57 PM

राज्य सरकारच्या न्याय विभागाने 10 जुलै रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला होता.

मुंबई - राजधानी मुंबईतीलउच्च न्यायालयाच्या न्यायाधीश महोदयांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडील मुंजरी प्राप्त प्रस्तावानुसार, न्यायाधीश महोदयांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांनाही या आदेशानुसार लाभ घेता येणार आह. याप्रकरणी मुख्य सचिव आणि मुख्य न्यायाधीश यांच्यात 5 ते 6 महिन्यांपूर्वी चर्चा झाली होती. 

राज्य सरकारच्या न्याय विभागाने 10 जुलै रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला होता. संयुक्त सचिव योगेश आमेटा यांच्या सहीने शासन आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशास चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबईन्यायालय