Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिठीबाई महाविद्यालयाच्या १,७०० विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:06 IST

विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्याचे मुंबई विद्यापीठाला निर्देशमिठीबाई महाविद्यालयाच्या १,७०० विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासाविद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्याचे मुंबई ...

विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्याचे मुंबई विद्यापीठाला निर्देश

मिठीबाई महाविद्यालयाच्या १,७०० विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्याचे मुंबई विद्यापीठाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विलेपार्ले येथील एसव्हीकेएम मिठीबाई महाविद्यालयाच्या १,७६३ विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. मिठीबाई महाविद्यालय यूजीसीने २०१८ मध्ये स्वायत्त शैक्षणिक संस्थेचा दर्जा दिल्यानंतर महाविद्यालयाने शैक्षणिक वर्षांमधेच गुणपद्धतीत बदल केला. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. मात्र, बुधवारी उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठाला दिले.

विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे अडवणे हे बेकायदेशीर आहे. विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला असेल किंवा नोकरी करत असतील तर त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे देण्यास नकार दिल्याने मिठीबाई विद्यालयाने उच्च न्यायालय याचिका दाखल केली. २०१८ मध्ये यूजीसीने स्वायत्त शैक्षणिक संस्थेचा दर्जा दिल्यानंतर महाविद्यालयाने सुधारित गुणप्रणालीनुसार, श्रेणीव्यतिरिक्त महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुण देण्यासही सुरुवात केली, असे याचिकेत म्हटले आहे.

मुंबई विद्यापीठाने गुणपद्धत बंद करून श्रेणीपद्धत सुरू केली होती.

‘मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र देण्यास नकार देण्याकरिता दिलेले कारण अस्पष्ट आहे व टिकणारे नाही. हे कारण अयोग्य असून, ते रद्द केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी परीक्षाही दिली आणि त्यांना गुणपत्रिका टक्केवारीसहीत देण्यात आल्या आहेत. त्या आधारावर काही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी देशातील व परदेशातील अन्य महाविद्यालयांत प्रवेश घेतला आहे तर काहींनी नोकरीही स्वीकारली आहे. त्यामुळे आता त्या गुणपत्रिका मागे घेऊन श्रेणीच्या आधारावर पुन्हा निकाल देणे व पुन्हा सादर करणे अशक्य आहे, असे न्यायलयाने म्हणत मुंबई विद्यापीठाला चार आठवड्यांत मिठीबाई महाविद्यालयाच्या १,७६३ विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे देण्याचे निर्देश दिले.