Join us  

मेट्रो कारशेडसाठी २ हजार ६०० वृक्ष कापण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 2:50 AM

वृक्ष कापण्याची परवानगी देताना महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील २ हजार ६०० वृक्षांची कत्तल व ट्रान्सप्लांट करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला एका पर्यावरण कार्यकत्यार्ने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने वृक्ष कत्तलीचा निर्णय घेतला नाही, असा आरोप झोरू बाथेना यांनी याचिकेद्वारे केला आहे.

वृक्ष कापण्याची परवानगी देताना महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही. वृक्षांची कत्तल करण्याची परवानगी देण्याचा निर्णय प्राधिकरणाच्या कोणत्या बैठकीत घेण्यात आला. त्या बैठकीची माहिती देण्याचे निर्देश महापालिकेला द्यावेत आणि तोपर्यंत २९ आॅगस्टच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी विंनती याचिककर्त्याने केली आहे. याचिकेनुसार, २९ आॅगस्ट रोजी वृक्ष प्राधिकरण समितीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल) ने वृक्ष कापण्यासंदर्भात ठेवलेला प्रस्ताव मंजूर केला.प्राधिकरणाने २,१८५ झाडे कापण्याची आणि ४६१ वृक्षांचे ट्रान्सप्लांट करण्याची परवानगी दिली. सध्या प्राधिकरणावर १९ सदस्य आहेत. त्यात महापालिका आयुक्तांचा समावेश आहे.याचिकेनुसार, वृक्ष कत्तलीचा निर्णय मंजुरी देताना तो ८ सदस्य विरुद्ध ६ असा मंजूर झाला. दोन स्वतंत्र सदस्य मतभेतामुळे निघून गेले. त्याशिवाय सहा सद्स्य या निर्णयाला विरोध का करत होते, याची कारणे नमूद करण्यात आली नाहीत. त्यामुळे हा निर्णय योग्य नाही, असे बाथेना यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबईन्यायालय