Join us  

शहरात पावसासाठी हाय अलर्ट; विकेण्डला मुंबईत मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:06 AM

मान्सूनपूर्व पावसानेच सोमवारी तासाभरात ट्रेलर दाखविल्याने मुंबईकर आणि महापालिकेचेही धाबे दणाणले आहे. येत्या विकेण्डला मुंबईत सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

मुंबई : मान्सूनपूर्व पावसानेच सोमवारी तासाभरात ट्रेलर दाखविल्याने मुंबईकर आणि महापालिकेचेही धाबे दणाणले आहे. येत्या विकेण्डला मुंबईत सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. पाणी तुंबणाऱ्या सखल भागांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून, धोका वेळीच कळण्यासाठी नद्यांनाही ट्रान्समीटर बसविण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) नौदल, अग्निशमन दलाचे विशेष पथक तैनात ठेवण्यात आले आहे.मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत सोमवारी संध्याकाळीच जोरदार हजेरी लावली. मात्र तासाभराच्या पावसातच पालिकेचे दावे वाहून गेले. या आठवड्यात शुक्रवार, ८ जून ते रविवार, १० जून या तीन दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. याची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी मंगळवारी सर्व पावसाळीपूर्व कामांची पाहणी केली. दरवर्षी हमखास पाणी भरणाºया २२५ ठिकाणांपैकी १२० ठिकाणी पाण्याच्या निचºयासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर रेल्वेचे कल्वर्ट या वेळी खास डिजिटल कॅमेºयाने साफ केल्याचा दावाही करण्यात येत आहे.असा मिळणार धोक्याचा इशारानद्यांमधील वाढलेली पाण्याची पातळी मोजण्यासाठी आतापर्यंत कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नव्हती. गेल्या वर्षी पावसाळ्यात मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मध्यरात्री क्रांतीनगरच्या झोपडपट्टीतील कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले होते. तर दहीसर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बोरीवली आणि दहीसरमधील नॅशनल पार्क परिसरात पूर आला होता. येत्या पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भविण्यापूर्वी आगाऊ सूचना मिळण्याकरिता मुंबईतील नद्यांवर रडार लेव्हल ट्रान्समीटर बसविण्यात आले आहेत. मिठी, ओशिवरा, पोयसर, दहीसर या नद्यांच्या काठावर हे ट्रान्समीटर बसविण्यात आले आहेत.अशी आहे पालिकेची तयारी...मदतकार्यासाठी पथक तैनातराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे परळ येथील कार्यालय, मानखुर्द अग्निशमन केंद्र आणि अंधेरी क्रीडा संकुलात असे प्रत्येकी एक पथक पावसाळ्यात तैनात असणार आहे. या पथकाकडे वॉकी टॉकी आणि मदतकार्यासाठी आवश्यक साहित्य असणार आहे.नौदल आणि अग्निशमन दल सज्जकुलाबा, वरळी, घाटकोपर, ट्रॉम्बे, मालाड येथे नौदलाचे पथक मदतकार्यासाठी सज्ज असणार आहे. तर अग्निशमन दलाची सहा पथके कमांडिंग सेंटर्समध्ये असणार आहेत.चौपाट्यांवरही नजरअग्निशमन दलाबरोबरच केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आणि पोलिसांचे पथक मुंबईतील सहा प्रमुख किनाºयांवर तैनात असणार आहे. मोठ्या भरतीच्या काळात समुद्रात मोठ्या लाटा उसळत असतात. त्यामुळे हे पथक किनारपट्टीवर सतर्क असणार आहे.आपत्कालीन सेवा : बेस्ट, पोलीस, वाहतूक पोलीस, शिक्षण अधिकारी या प्रतिनिधींना समन्वयासाठी महापालिका मुख्यालयात तैनात राहावे लागणार आहे. त्यांच्याबरोबरच विभागातील सहायक आयुक्तांनाही आपापल्या विभागांत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.रिचेबल राहण्यासाठीनिवाºयासाठी मुंबईतील सर्व २४ विभागांमधील शाळा २४ तास खुल्या ठेवण्यात येणार आहेत. तसेच संपर्कासाठी हॅम रेडिओ असणार आहेत.नाल्यांची सफाई : मिठी नदी, मोठ्या व लहान नाल्यांच्या सफाईची कामे पूर्ण झाली असली तरी त्यात पुन्हा कचरा टाकला जात असल्यामुळे दुसºयांदा आणि काही ठिकाणी तिसºयांदा नालेसफाईची कामे केली असल्याचा दावा अधिकाºयांनी केला. पावसाळ्यापूर्वी ६० टक्के नालेसफाई केली जाते, या वेळी काही ठिकाणी ७० टक्के गाळ काढल्याचा दावा करण्यात येत आहे.अधिका-यांची रजा रद्द९ आणि १० जून रोजी महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त आणि विभाग प्रमुखांना कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ९ तारखेला दुसरा शनिवार आणि १० तारखेला रविवार असल्याने महापालिका कार्यालयाला सुट्टी असते. मात्र या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.मेट्रोच्या कामांच्या ठिकाणी २४० पंपमेट्रोच्या कामांसाठी मुंबईत सर्वत्र खोदकाम केले असल्याने पाणी तुंबण्याचा धोका संभवतो. त्यामुळे एमएमआरडीए आणि एमएमआरसीएलने अशा प्रत्येक ठिकाणी २४० पंप बसविले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :मुंबईपाऊस