Join us  

मुंबईवर वॉच 'तिसऱ्या' डोळ्याचा ! गुन्हे उघडकीस आणण्यात बजावली महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:30 AM

मायानगरी मुंबईवर मुंबई पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याचा म्हणजे सीसीटीव्हीचा वॉच आहे.

मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर शहर अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले. शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मायानगरी मुंबईवर मुंबई पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याचा म्हणजे सीसीटीव्हीचा वॉच आहे. शहरात उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यास पोलिसांना या सीसीटीव्हीची मदत होत आहे.

मुंबई पोलिस दलाला आपत्कालीन एक सर्व्हिलन्स व्हॅन देण्यात आली आहे. व्हॅनच्या छतावर चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून याच छतावर वायरलेस आणि सॅटेलाईट डीश बसविण्यात आली आहे. याचे नियंत्रण व्हॅनच्या आत बसविण्यात आलेल्या सहा स्क्रीन आणि मशिनच्या आधारे करण्यात येते.

अॅम्बिस प्रणाली :

१ पूर्वी बोटांच्या ठशांवरून आरोपींची ओळख पटवण्यात येत असे; मात्र अॅम्बीसमुळे बोटांच्या ठशांसोबत बुब्बुळ, हाताच्या तळव्यांचे ठसे, चेहरा किंवा छायाचित्रांद्वारे संशयितांची, आरोपींची, गुन्हेगारांची ओळख चुटकीसरशी पटवली जाईल.

एकाचवेळी साडेसहा लाख २ गुन्हेगारांचे तपशील ही यंत्रणा उपलब्ध करून देत आहे. इतकेच नव्हे तर छायाचित्रावरून किंवा सीसीटीव्हीनी कैद केलेल्या चित्रणावरूनही गुन्हेगारांची ओळख पटू शकेल, त्यांची इत्यंभूत माहिती पोलिसांना मिळू शकेल.

■ या व्हॅनद्वारे तेथील सर्व परिस्थितीचे चित्रिकरण करण्यात येत असून ते थेट मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून बघता येते. तसेच या परिस्थितीची वायरलेस यंत्रणेच्या मदतीने माहितीही देणे शक्य होत आहे.

अद्ययावत वेबसाइट, नियंत्रण कक्ष अन्...

■ अद्ययावत वेबसाईट, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष तसेच पोलिस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली.

• शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी दंगल, मोर्चा, मोठे आंदोलन, सभा किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उ‌द्भवली तर ही व्हॅन तेथे पाठविण्यात येते.

यंत्रणेत आणखीन बदल होणे गरजेचे :

मुंबई पोलिसांच्या द्विटर अकाऊंटनेही या अद्ययावत यंत्रणेत कात टाकली आहे; मात्र बदलत जाणाऱ्या टेक्नॉलॉजीनुसार, या यंत्रणेत आणखीन बदल होणे गरजेचे असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ही परिस्थिती हाताळणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक सोयीस्कर ठरताना दिसत आहे.

• व्हॅनमधून ही यंत्रणा चालविण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्त्ती करण्यात आली असून मुंबई पोलिस दलाला आधुनिक करण्यात एक महत्त्वाचे पाऊल आहे. एकूणच ही व्हॅन म्हणजे एक मिनी चालता फिरता नियंत्रण कक्षच आहे.

टॅग्स :सीसीटीव्हीमुंबई पोलीस