Join us

हेटवणो ओसंडून वाहू लागले

By admin | Updated: August 5, 2014 00:16 IST

पेणमधील सर्वात मोठे हेटवणो मध्यम प्रकल्प 2 ऑगस्ट रोजी पूर्णक्षमतेने भरून ओसांडून वाहू लागले.

पेण : पेणमधील सर्वात मोठे हेटवणो मध्यम प्रकल्प 2 ऑगस्ट रोजी पूर्णक्षमतेने भरून ओसांडून वाहू लागले. पिण्याचे पाणी, सिंचन व्यवस्था व कमर्शिअल वापरासाठी नवी मुंबई नागरीवस्त्यांना पाणीपुरवठा करणारे हेटवणो धरणात पाण्याची विपुलता परिपूर्ण झाली आहे. 147.क्5 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असणारे धरण ओव्हरफ्लो झाल्याने 2क्15 वर्षाच्या अखेर्पयत पूर्णपणो पाण्याची समस्या निकाली निघाली आहे.
पेणमध्ये धरणांची वानवा नाही. हेटवणो, आंबेघर, शहापाडा व प्रस्तावित असलेल्या बाळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे पेणमध्ये पाण्याची विपुलता समृध्द आहे. जुलैच्या मध्यावधीत भरणारे हेटवणो अखेर ऑगस्ट प्रारंभालाच भरणार हे 25 जुलैच्या शहापाडा पूर्णक्षमतेने भरल्यावर सिध्द झाले होते. धरणाच्या सांडव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग  होत आहे. 147.क्5 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असल्याने धरण ओव्हर फ्लो झाल्यावर पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत येणारे मासे पकडण्यासाठी मच्छीमार व स्थानिक नागरिकांची चंगळ असते. वर्षाकाठी ओसंडून वाहणा:या प्रवाहाची प्रतीक्षा येथील स्थानिकांना असतेच. हेटवण्याच o्रीमंती अशासाठी की सिडको, नवी मुंबईला पाणीपुरवठा, सिंचनासाठी 8क् दशलक्ष घनमीटर आरक्षित पाणी, स्थानिकांना पाणी पुरवठा व खारेपाटाला पाणी पुरवठा करण्यासाठी आरक्षित पाणी तरीही वर्ष दोन वर्ष पुरेल इतके पाणी शेष असतेच, सिंचन क्षेत्रतील 52 गावे व 6668 हेक्टर शेतीला पाणी देण्याचे आरक्षण ही हेटवण्याची वैशिष्टय़े आहेत. शहापाडा धरणाला घरघर लागल्यानंतर हेटवण्याचे पाणी, मात्र थेट वितरण व्यवस्था नसल्याने हेटवण्याचे ऐश्वर्य स्थानिक व पेणकरांना उपभोगता येत नाही. (वार्ताहर)