Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयाची पुरातन वास्तू ही सुमारे दीडशे वर्षे जुनी आहे. सीएसटीएम रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर ...

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयाची पुरातन वास्तू ही सुमारे दीडशे वर्षे जुनी आहे. सीएसटीएम रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर या इमारतीतही गाईडेड हेरिटेज वॉक घेता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सफरीला गुरुवारपासून सुरुवात होईल. पर्यटकांना गार्डडच्या माध्यमातून इमारतीचा इतिहास, आताचे महत्त्व सांगितले जाईल.

.............................

२, ३ फेब्रुवारीला जोगेश्वरी ते वांद्रे पाणीकपात

मुंबई : अंधेरी पूर्वेत हॉटेल रिजन्सीजवळ १३५० मि.मी. व्यासाची वांद्रे आऊटलेट आणि १२०० मि.मी. व्यासाची पार्ले आऊटलेट या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे काम तसेच झडप बदलण्याचे काम २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० ते ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत करण्यात येईल. या कालावधीत जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, खार, वांद्रे येथील काही भागांत कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होईल.

..................