Join us

विद्यामंदिर दहिसर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:06 IST

मुंबई : विद्यामंदिर दहिसर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात अनेक घरांमधील पालकांच्या नोकऱ्या ...

मुंबई : विद्यामंदिर दहिसर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात अनेक घरांमधील पालकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना पगार मिळाले नाहीत. यामुळे अनेक कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अनेक जण आपल्या मुलांची शालेय फी भरण्यास असमर्थ झाले आहेत. परिणामी अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेच लक्षात घेत विद्यामंदिर दहिसर शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिता चुरी यांनी माजी विद्यार्थ्यांना या होतकरू मुलांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत १९९५ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी निधी जमा केला व जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिली. माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट अजित मांजरेकर व अभिजित वराडकर यांच्या हस्ते शाळेला धनादेश सुपूर्त करण्यात आला. या मदतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका चुरी यांनी आभार मानले.