नारायण जाधव - ठाणो
मुंबईच्या झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर भागात 13 जुलै 2क्11 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत ठार झालेल्या ठाणो जिल्ह्यातील मृतांच्या वारसांना अखेर चार वर्षानतर केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्याच्या महसूल खात्याने प्रत्येकी तीन लाख याप्रमाणो 12 लाखांचा निधी ठाणो जिल्हाधिका:यांकडे सुपुर्द केला आह़े
या मृतांमध्ये भूपतभाई मुकुंदभाई नवाडिया, हिंमतभाई कालूभाई गडिया, लालचंद राधाकृष्ण आहुजा आणि बाबुराम शिबू दास यांचा समावेश आह़े या चारही मृतांच्या वारसांना प्रत्येकी तीन लाख याप्रमाणो 12 लाखांचा मदत निधी ठाणो जिल्हाधिका:यांनी वाटायचा आह़े महसूल खात्याने ही रक्कम 16 सप्टेंबर रोजी ठाणो जिल्हाधिका:यांकडे सुपुर्द केली आह़े
13 जुलै 2क्11 रोजी मुंबई शहरात झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर पश्चिम भागात हे साखळी बॉम्बस्फोट झाले होत़े यात सुमारे 27 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यातील ठाणो जिल्ह्यातील चौघा मृतांच्या वारसांना तब्बल चार वर्षानंतर राज्य शासनाने मदत जाहीर केली आह़े उर्वरित जखमी आणि मृतांपैकी किती जणांच्या वारसांना शासनाने मदत जाहीर केली, ती प्रत्यक्षात सुपुर्द केली याचा तपशील मात्र महसूल विभागाने दिला नाही़ मात्र सूत्रंच्या म्हणण्यानुसार गृह आणि महसूल खात्यात नसलेला समन्वय, मृतांच्या वारसांची ओळख पटवण्यात झालेला विलंब यामुळे टप्प्याटप्प्याने ही मदत जाहीर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े