Join us

७ दिवसांत मदत

By admin | Updated: May 11, 2015 03:48 IST

गोकूळ हाउस इमारतीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील शहीद अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती महापालिकेने सांत्वन व्यक्त केले आहे.

मुंबई : गोकूळ हाउस इमारतीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील शहीद अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती महापालिकेने सांत्वन व्यक्त केले आहे. शहीद अधिकाऱ्यांची सर्व शासकीय देणी सात दिवसांच्या आत त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात येतील; तसेच जखमी अधिकारी व जवान यांना सर्वोच्च वैद्यकीय उपचार सुविधा पुरविण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.काळबादेवी परिसरातील गोकूळ हाउस या इमारतीला शनिवारी सायंकाळी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा आयुक्त अजय मेहता यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी) सुनील नेसरीकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन व इतर जवान यांना आवश्यक ते सर्वोच्च वैद्यकीय उपचार सुविधा देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यावर अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. पल्लवी दराडे लक्ष ठेवून आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, या एकूण घटनेची तपशीलवार चौकशी करण्यात येईल, असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)चौकशी समितीमध्ये कोण असेल?अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) - अध्यक्षसंचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा - सदस्यउपायुक्त, मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण (अग्निशमन सेवा) - सदस्यप्रमुख अभियंता, यांत्रिकी व विद्युतीकरण - सदस्यसंचालक, अभियांत्रिकी व सेवा - सदस्यप्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी) - सदस्यप्रमुख अधिकारी, आपत्कालीन व्यवस्थापन - सदस्य सचिव