Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो.... मोबाइलवर बोलणे पडले महागात!

By admin | Updated: September 1, 2014 22:45 IST

मोबाइलवर बोलणे पडले महागात!

मोबाइलवर बोलणे पडले महागात!
लोकलच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

मुंबई : जोगेश्वरी स्थानकादरम्यान मोबाइलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडताना एका तरुणीला लोकलने धडक दिली. या अपघातात तरु णीचा जागीच मृत्यू झाला आहे. रितूल बाफना असे या तरुणीचे नाव असून, ती राजस्थान येथील रहिवासी असल्याचे समजते. मोबाइलवर बोलणे आणि ट्रॅक ओलांडणे या दोन्ही गोष्टींमुळे या तरुणीला जीव गमवावा लागला आहे.
अंधेरी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितूल ही सोमवारी दुपारी अंधेरी स्थानकात आली. साडेचार वाजताच्या सुमारास रितूल ही जोगेश्वरी स्थानकातून रेल्वे ट्रॅक ओलांडत होती. रितूल मोबाइलवर बोलत असल्याने तिला चर्चगेटला जाणार्‍या जलद लोकलचा अंदाज आला नाही. लोकलने धडक दिल्याने ती जागीच गतप्राण झाल्याची माहिती अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश किर्दत यांनी दिली. रितूलचा मृतदेह कूपर रु ग्णालयात पाठवण्यात आला असून, तिच्या पर्समध्ये पॅन कार्ड सापडले आहे. पॅन कार्डवर राजस्थानचा पत्ता आहे. तिच्या मोबाइलवरून नातेवाइकांशी संपर्कदेखील साधण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)