पालघर : भाजपाच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हॅलीकॉप्टरने परवानगी न घेता लँडींग केल्याची गंभीर दखल जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी घेतली असून विष्णु सावरांसह अन्य दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.भाजपा नेते व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे १ आॅक्टो. रोजी जव्हार येथे आले होते. यावेळी हॅलीकॉप्टरच्या लँडींगसंदर्भात निवडणूक विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असताना सावरा यांनी परवानगी घेतली नसल्याची बाब समोर आली. जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर यांनी संबंधीतांना नोटीस बजावली होती. बांगर यांनी सावरा, भरत सोनार, सचिन सटाणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. त्या आदेशान्वये पोलीसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जव्हारचे पोलीस अधिकारी जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)
हेलिकॉप्टर लँण्डिंग भोवले
By admin | Updated: October 11, 2014 00:08 IST