Join us

हेगडे, धुरी हे धनंजय मुंडे यांचे मित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माझ्यावर खोटे आरोप करणारे कृष्णा हेगडे, मनीष धुरी हे धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माझ्यावर खोटे आरोप करणारे कृष्णा हेगडे, मनीष धुरी हे धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत. माझ्यावर आरोप करून त्यांना मदत करीत आहेत, असा आरोप तरुणीने केला. डी. एन. नगर पोलीस साहाय्यक आयुक्तालयात तिचा शनिवारी जबाब नोंदवून घेण्यात आला. त्यापूर्वी तिने पत्रकारांशी संवाद साधताना तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांनी आपल्यावर सातत्याने अत्याचार केल्याची या तरुणीची तक्रार आहे. भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांचा मी आदर करते. ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतात हे मला माहीत नाही. मनसेचे नेते मनीष धुरी यांना मी माझ्या अडकलेल्या अल्बमसंदर्भात भेटले होते. त्यानंतर ते मला दारू पिऊन कॉल करायचे, असा आरोप तरुणीने केला. दरम्यान, हेगडे यांच्याप्रमाणेच धुरी यांनी हे आराेप फेटाळून लावले.

.