Join us

आजही कोसळणार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST

मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात झालेल्या लक्षणीय बदलाने मुंबईसह राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला असून, ...

मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात झालेल्या लक्षणीय बदलाने मुंबईसह राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला असून, मंगळवारनंतर आता बुधवारीदेखील मान्सूनचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडील माहितीनुसार, बुधवारी संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर उर्वरित महाराष्ट्र म्हणजे मध्य महाराष्ट्राला यलो, तर विदर्भासह उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडील माहितीनुसार, गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांच्याकडील माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पावसाच्या नोंदी होत असून, कोकणात विशेषत: उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव अधिक दिसून आला आहे. उत्तर महाराष्ट्र म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पुणे व अहमदनगरमध्ये पावसाचा प्रभाव आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होईल; पण सर्वदूर पाऊस असेल.