Join us  

मुंबईत दोन दिवस काही ठिकाणी जोरदास पाऊस पडण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 1:04 AM

पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण वाढण्याची चिन्हे

मुंबई : मान्सून मुंबईत दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर सोमवारी पावसाने काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. मात्र पश्चिम उपनगरात पाणी तुंबल्याने दुपारी अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. पुढील दोन दिवस काही भागांत जोरदार सरी कोसळतील. या आठवड्यात पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत.  सोमवारी मुंबईतील काही भागांमध्ये तुरळक सरींनी हजेरी लावली. मात्र मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस मुंबईत पाऊस जोरदार हजेरी लावणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हाच अंदाज ठाणे आणि पालघर या परिसरासाठीही वर्तविण्यात आला आहे. स्कायमेटद्वारे १५ ते १८ जूनदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.जून महिन्यातील ५० टक्के कोटा पूर्णजून महिन्यात सरासरी ४९३.१ मी.मी. पावसाची नोंद होत असते. मात्र हवामान खात्याच्या सांताक्रुझ विभागात आतापर्यंत २४५.५ मि.मी. म्हणजेच ४९.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच या महिन्यातील५० टक्के पावसाची नोंद निसर्ग चक्रीवादळाच्या काळात झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत कुलाबा येथे २७.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर दिवसभरात आठ ठिकाणी झाडे अथवा झाडाच्या फांद्या पडल्या.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या १५ जून रोजी एकूण एक लाख ७९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा आहे. गेल्या वर्षी याच काळात ९७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा तलावांमध्ये होता.