Join us

पालघरमधील इंजिनीअरिंग कंपनीला भीषण आग

By admin | Updated: November 3, 2014 00:27 IST

पालघमधील जनेसीस औद्योगिक वसाहतीमधील आनंद इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली

पालघर : पालघमधील जनेसीस औद्योगिक वसाहतीमधील आनंद इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. यामध्ये कामगार किरकोळ जखमी झाले आहे. ॅँही आग आटोक्यात आणण्यासाठी पालघर व बोईसरमधील अग्निशामक दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.पालघर-बोईसर मार्गावरील कोळगाव येथील जेनेसीस औद्योगिक वसाहतीमधील आनंद इंजिनिअर्स या कंपनीला दुपारी दोनच्या सुमारास मोठी आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी तीन तास आटोकात प्रयत्न करण्यात आला. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काही प्रमाणात कंपनीतील आग मात्र धुमसत होती. या कंपनीतून ५० ते ६० कामगार काम करीत असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असून या कंपनीत आॅईल आणि ग्रीसचा मोठा साठा असल्याने आगीने रौद्र रुप धारण केल्याचेच चित्र पाहावयास मिळाले . या कंपनीच्या बाजूला अन्य कंपनी नसल्याने या आगीचे लोण दुरवर पसरले नाही.जखमी कामगाराला पालघरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस यांनी दिली. कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी उपाय करण्याची मागणी होत आहे.