Join us

आदर्श घोटाळ्याची आज सुनावणी

By admin | Updated: December 12, 2014 02:13 IST

बहुचर्चित आदर्श घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने पक्षकार करण्याचा अर्ज नाकारल्याने माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर- पाटील यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आह़े

मुंबई : बहुचर्चित आदर्श घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने पक्षकार करण्याचा अर्ज नाकारल्याने माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर- पाटील यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आह़े
निलंगेकर-पाटील यांनी महसूल मंत्री असताना वादग्रस्त आदर्श सोसायटील विविध परवानग्या मंजूर केल्या होत्या़ त्यामुळे त्यांना या घोटाळ्यात आरोपी करावे, अशी मागणी करणारा अर्ज सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी विशेष सीबीआय न्यायालयात केला आह़े या अर्जात पक्षाकार करावे व याबाबतचे आपलेही म्हणणो ऐकावे, अशी विनंती करणारा अर्ज निलंगेकर-पाटील यांनी विशेष न्यायालयात केला होता़ 
विशेष न्यायालयाने तो फेटाळला़ याविरोधात निलंगेकर-पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आह़े यावर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार 
आह़े (प्रतिनिधी)