जव्हार : माता मृत्यूचे दर कमी करण्यासह जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तिन्ही तालुक्यांतील चांगल्या कामगीरीबद्दल शुक्रवारी जव्हारचे अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.पी.पाटील व ठाण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनवणे यांना रोटरी क्लब आणि रोटरी क्लब आॅफ यु.के. लंडन यांच्या वतीने डॉ. पियूषा, यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी लंडनचे कॅरोलीन, मनजीत, ज्युडी ईव्ह व ठाण्याचे डॉ. बाळ इनामदार, डॉ. संदीप कदम, डॉ. चित्रा चव्हाण, डॉ. राकेश पांड्या व डॉ. दानी हे रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या २३ वर्षापासून जव्हार,मोखाडा, विक्रमगड सारख्या ९९ टक्के आदिवासी अतिदुर्गम पाड्यांत यशस्वी आरोग्य सेवा देत असलेले डॉ. पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी त्यांना आदर्श वैद्यकिय अधिकारी पुरस्कार व साथीच्या रोगाच्या निर्मूलनात चांगले काम केल्याबद्दल जिल्हा परिषद, ठाणे यांच्या वतीने गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. (वार्र्ताहर)
आरोग्य अधिकारी पाटील यांचा सत्कार
By admin | Updated: January 28, 2015 23:29 IST