Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेडफोन न दिल्याने हल्ला, गळ्यावर केला धारदार शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 04:04 IST

ब्ल्यू टूथ हेडफोन वापरण्यास न दिल्याने, शेजा-याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्याची घटना शुक्रवारी रात्री वडाळ्यातील कोरंबा

मुंबई : ब्ल्यू टूथ हेडफोन वापरण्यास न दिल्याने, शेजा-याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्याची घटना शुक्रवारी रात्री वडाळ्यातील कोरंबा मिठागर परिसरात घडली. या प्रकरणी मनोज राजकुमार गुप्ता (वय २३, रा. वडाळा पूर्व) यास वडाळा पोलिसांनी अटक केली. त्याने केलेल्या हल्ल्यात दत्तात्रय शंकर जाधव (४७) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जाधव व मनोज गुप्ता एकाच परिसरात राहत असून, ते एकमेकांना ओळखत होते. शुक्रवारी गुप्ताने दत्तात्रय जाधव यांच्याकडील ब्ल्यू टूथ हेडफोन मागितला. मात्र, त्यांनी त्याला नकार देताच गुप्ताने त्याच्याकडील शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर, ते रक्तबंबाळ होऊन पडल्याचे पाहून त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.