लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरीतील एका इंटरनॅशनल शाळेत चार वर्षीय मुलीवर विश्वस्ताने बलात्कार केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला होता. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून शाळेचा विश्वस्त विदेशातच असल्याचे एमआयडीसी पोलिसांकडून सांगण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात १८ मे २०१७ला पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली. शाळेतील एका शिक्षिकेने आपल्याला आणि आणखी एका मुलीवर घाणेरडे चाळे करीत अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून शाळेच्या विश्वस्तासह एका शिक्षिकेविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली.
‘तो’ विश्वस्त विदेशातच
By admin | Updated: July 2, 2017 06:37 IST