Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीकडे पाहिले म्हणून वृद्धाला चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:33 IST

पत्नीकडे वाईट नजरेने पाहण्याच्या संशयातून एकाने ६० वर्षांच्या वृद्धाला दगडाने मारहाण केल्याची घटना कुरारमध्ये घडली. या प्रकरणी हनुमता कुºहाडे (४५) याच्याविरुद्ध कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : पत्नीकडे वाईट नजरेने पाहण्याच्या संशयातून एकाने ६० वर्षांच्या वृद्धाला दगडाने मारहाण केल्याची घटना कुरारमध्ये घडली. या प्रकरणी हनुमता कुºहाडे (४५) याच्याविरुद्ध कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कांदिवली पूर्वेकडील अशोकनगर परिसरात इस्माईल नुरमोहम्मद शेख हे पत्नी आणि मुलांसोबत राहतात. ते व्यावसायिक आहेत. याच परिसरात कुºहाडे हा मासेविक्रीचा व्यवसाय करतो. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तो दारूच्या नशेत शेख यांच्या दुकानासमोर आला. तेव्हा शेख यांना पत्नीकडे काय पाहतोस, असा प्रश्न केला. त्यावर शेख यांनी त्याला पत्नीकडे पाहिले नसल्याचे सांगितले. मात्र कुºहाडेने याच संशयातून शेख यांना शिवीगाळी करण्यास सुरुवात केली आणि जवळील दगड घेऊन त्यांना मारहाण केली. यामध्ये त्यांना डोक्याला जबर मार बसला. त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत समजताच त्यांनी शेख यांना रुग्णालयात दाखल केले. घटनेची वर्दी लागताच कुरार पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी शेखच्या तक्रारीवरून कुºहाडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.