Join us

श्वानासोबत त्यानेही गमावला जीव

By admin | Updated: May 6, 2017 04:08 IST

समुद्रात बुडत असलेल्या श्वानाचा जीव वाचविताना एका व्यावसायिकाचा दुबईत मृत्यू झाला आहे. नितीन शेणॉय (४१) असे व्यावसायिकाचे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समुद्रात बुडत असलेल्या श्वानाचा जीव वाचविताना एका व्यावसायिकाचा दुबईत मृत्यू झाला आहे. नितीन शेणॉय (४१) असे व्यावसायिकाचे नाव आहे. यामध्ये श्वानाचाही मृत्यू झाला आहे. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात शेनॉय राहायचे. ते एका आयटी कंपनीचे संस्थापक आहेत. कामाच्या निमित्ताने ते दुबईत गेले होते. नितीन हे पाम जुमैराहमधील सी फेसिंग बंगल्यात थांबले होते. काम आटोपल्यावर फेरफटका मारण्यासाठी ते बाहेर पडले. दरम्यान एक श्वान समुद्रात बुडत असल्याचे त्यांच्या नजरेत पडला. तो श्वान त्यांच्या नातेवाइकाचा होता. त्यांनी त्याच्या बचावासाठी समुद्रात उडी घेतली. मात्र ते खोलवर गेल्याने त्यांचा व श्वानाचाही मृत्यू झाला.