Join us

पाण्याच्या प्रश्नाने रहिवासी हवालदिल

By admin | Updated: March 30, 2015 23:44 IST

वसई विरार शहर महानगरपालिकेचा प्रभाग क्र. ७९ हा वसई-भिवंडी मार्गावर कामण परिसरामध्ये आहे. गेली अनेक वर्षे ३ ते ४ ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन

दीपक मोहिते, वसईवसई विरार शहर महानगरपालिकेचा प्रभाग क्र. ७९ हा वसई-भिवंडी मार्गावर कामण परिसरामध्ये आहे. गेली अनेक वर्षे ३ ते ४ ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन या भागातील काही विकासकामे करण्यात आली. परंतु पाणीपुरवठा व अन्य विकासकामांसाठी त्याकाळी पर्याप्त आर्थिक निधी उपलब्ध न झाल्यामुळे अनेक विकासकामे प्रलंबित राहिली. महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर या परिसरातील प्रलंबित विकासकामांवर १० कोटी रू. खर्च केल्याचा दावा केला जातो आहे. गेल्या साडेचार वर्षात रस्ते, गटारे, स्मशानभूमी नूतनीकरण, जुन्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण इ. विकासकामे करण्यात आली. दर उन्हाळ्यात मात्र येथील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या प्रभागातून पूर्वीच्या कामण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मदन हाशा गोवारी निवडून आले आहेत. या प्रभागामध्ये नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्यात यावी यासाठी त्यांनी वेळोवेळी महासभेमध्ये आवाज उठवला. परंतु, अद्याप त्यादृष्टीने कोणतीही हालचाल झालेली नाही. प्रभागातील कचरा मात्र दररोज उचलण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये रोगराई निर्माण होत आहे.