Join us

तुम्हालाही पैशांसाठी मालकाचा मेल आलाय का?

By admin | Updated: July 21, 2016 02:27 IST

तुम्हालाही तुमच्या कंपनीच्या मालकांचा पैशांसाठी मेल आला आहे का?

मनीषा म्हात्रे,

मुंबई- तुम्हालाही तुमच्या कंपनीच्या मालकांचा पैशांसाठी मेल आला आहे का? तर सावधान.. त्या मेलवरुन खात्यात पैसे भरण्यापूर्वी थांबा आणि खातरजमा करा. कारण, गेल्या काही दिवसांत कंपन्यांचे मालक, व्यवस्थापक, अध्यक्षांच्या नावाने येत बोगस मेल पाठवून कंपन्यांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. अशा मेलने गेल्या पंधरवड्यात १५ पेक्षा जास्त कंपन्यांना गंडा घालण्यात आल्याने कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस शोध घेत आहेत.नामांकीत कंपन्यांमध्ये एक असलेल्या स्वॅन एनर्जी कंपनीच्या अकाऊंट विभागाला वरीष्ठ अधिका-याचा मेल आला. मेलमध्ये सप्लायरच्या खात्यात तत्काळ पैसे भरण्याचे सांगण्यात आले. तसेच मी मिटींग व्यस्त असल्याने कॉल करु नये असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे अशा मेलची खातरजमा न करता संबंधित खात्यात पैसे जमा केले. पैसे भरल्यानंतर त्याची माहिती वरीष्ठांना दिली. मुळात आपण कुठलाच मेल पाठवला नसल्याचे समजताच अकाऊंट विभागाला धक्काच बसला. त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी तक्रार दाखल केली. स्वॅन एनर्जी कंपनी प्रमाणेच वेगा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, क्रियेटीव्ह लॅण्ड एशिया लाखोंचा गंडा घातल्याप्रकरणी पोलीस सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर रेनहंस कंपन्यांसारखे अन्य कंपन्याचे तक्रार अर्ज दाखल आहेत. दिवसेंदिवस या कंपन्यांचे प्रमाण वाढत आहेत. अशा प्रकारच्या मेलद्वारे १५ पेक्षा जास्त बड्या कंपन्यांना गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे असा मेल येताच खातरजमा करणे गरजेचे असल्याचे सायबर क्राईमचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले. पैशांसर्दर्भात मेल येताच तो मेल पुन्हा तपासल्यास तो बोगस असल्याचे समोर येईल. त्यानंतर संबंधित व्यवस्थापक, मालकांशी बोलून घ्या. त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. >अशी चालते टोळीही टोळी मुंबईतील बड्या कंपन्यांच्या मालकांची माहिती मिळवते. त्यांच्या इमेल आयडीचा वापर करुन कंपन्यांना गंडा घालते. अशावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी मालकासोबत याची खातरजमा करुन घेणे गरजेचे आहे. मशिनरी संदर्भात व्यवहार असल्यास त्या सप्लायरशी बोलून घ्या. शक्यतो आॅनलाईन पेयमेंट टाळा असे आवाहन सायबर क्राईमचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी केले आहे.>या इमेल आयडीकडे असू द्या लक्ष..गंडा घातलेल्या कंपन्यांना ए७ीू.े@ी७ीू२.ूङ्मे या इमेल आयडीवरुन मेल आले आहेत. त्यामुळे या इमेल स्फुफिंगच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी सावध व्हा असे आवाहन सायबर पोलीस करत आहेत. असा इमेल प्राप्त होताच थेट पोलिसांशी संपर्क साधा.>उ.प्रदेशात जमा होताहेत पैसेया कंपन्यांना गंडा घालणारे रॅकेटने इमेल द्वारे पाठविलेले बँक खाते हे उत्तरप्रदेशातील आहेत. मुंबईतील कंपन्यांना गंडा घातलेली रक्कम उत्तरप्रदेशातून बाहेर काढली जात आहे. संबंधित बँक खात्यात जमा केलेले अकाऊंटही बोगस असल्याची माहिती तपासात उघड झाली.