मुंबई : ओशिवरा नदीतील अतिक्रमणावर पालिकेकडून येत्या ११ मे रोजी कारवाई केली जाणार आहे. ‘ओशिवराची झाली गटारगंगा’ या मथळ्याखाली शुक्रवारी ८ मेच्या ‘लोकमत’मध्ये हे वृत्त प्रसिद्ध होताच त्याचे तीव्र पडसाद पालिका वर्तुळात आणि गोरेगावकरांमध्ये उमटले. गोरेगाव (प.) परिसरात ‘लोकमत’ची बातमी व्हॉट्सअॅपच्या अनेक ग्रुपवर शेअर झाली.यासंदर्भात पालिकेच्या पी (दक्षिण) विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त रमाकांत बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता, हे वृत्त आपल्याला व्हॉट्सअॅपवरून नागरिकांनी पाठवल्याचे त्यांनी सांगितले. या नदीच्या पात्रातील अतिक्रमणे तोडण्याचे काम खरे तर जिल्हाधिकारी (उपनगरे) यांच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे आहे. परंतु तातडीची बाब म्हणून पालिकेतर्फे सोमवारी सुमारे १५० झोपड्यांवर हातोडा पडणार असून यासाठी बांगूर नगर पोलिसांचा बंदोबस्त मिळणार आहे. याबाबत पी (दक्षिण) विभागातर्फे कारवाईच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
ओशिवरा नदीतील अतिक्रमणावर हातोडा
By admin | Updated: May 9, 2015 03:35 IST