उल्हासनगर : महापालिकेने २७ अतीधोकादायक इमारतीची यादी घोषित करून त्यांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करून त्या अत्याधुनिक जेसीबी मशिनच्या मदतीने पाडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. गेल्या वर्षी पावसाळयात ५ इमारती जमिनदोस्त केल्या नंतर निधी अभावी पाडकाम कारवाई थांबवावी लागली होती.उल्हासनगरात १९९२ ते ९५ च्या दरम्यान रेती बंद असतांना वालवा रेती व दगडाच्या चुऱ्यापासून इमारती बांधल्या आहेत. त्या बहुंताश आता धोकादायक झाल्या असून चार वर्षात त्यातील काही इमारती कोसळून २३ जणांचा बळी गेला आहे. खाजगी संस्थेमार्फत शहरातील इमारतीचे सर्वेक्षण केल्यास धोकादायक इमारतीची संख्या हजारोच्या घरात जाणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
उल्हासनगरात २७ इमारतींवर पडणार हातोडा
By admin | Updated: June 26, 2015 22:55 IST